*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 10 June 2013

डाळींब-

डाळींब-
  1. डाळींबाचा पिकास द्यावयाच्या पालाशयुक्त खतासाठी म्युरेट ऑफ पोटॅश पेक्षा सल्फेट ऑफ पोटॅशची निवड करणे अधिक योग्य आहे आणि त्याचा वापर सेंद्रीय खताबरोबर केल्याने ऊत्पादनात वाढ होते.
  2. डाळींबामध्ये शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 0.005 टक्के + डायक्लॉटॉव्हस 0.5 टक्के आणि कार्बारील 0.25 टक्के + बोर्डोमिश्रण 1 टक्के + ट्रायकोडर्मा व्हीरीडी 0.5 टक्के हा संस्कार इतरांपेक्षा 15 दिवसांनी सर्वात चांगला परिणाम आढळून आला.
  3. डाळींब नवीन वाण - फुले अरक्ता ( नं 11।3 (303) ) या वाणाचे फळ रक्तासारखे लाल दिसते. व उत्पादन 29.83 कि.ग्रा. । झाड मिळते या वाणाचे बी मऊ गोड व परदेशात पाठविण्यासाठी उत्तम आहे. ह्या वाणात फळावरील ठीपके व फुलकिडे यांचासाठी संवेदनशील आहे.
  4. डाळींबामध्ये फ्युजेरिअम विल्टचा नियंत्रणासाठी कार्बारील + बोर्डोमिश्रण + ट्रायकोडर्मा व्हेरीडी 0.5 टक्के चा चांगला परिणाम मिळाला च्या वापराने 30 दिवसानंतर झाडात चांगली सुधारणा दिसून आली.
  5. हलक्या जमिनीत 5 मिटर * 5 मिटर अंतरावर लागवड करुन पुर्ण वाढलेल्या डाळींबाच्या झाडांना सुक्ष्म नळी ठीबकद्वारे 20% ओलीत क्षेत्र मिळण्याइतके पाणी दर दिवसाआड देण्याची शिफारस करण्यात येत आहे. या पध्दतीत उत्पादनात लक्षणीय वाढ होते व पाण्याची 30 टक्के बचत होते.