*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 10 June 2013

टोमॅटो-

टोमॅटो-
  1. टोमाटा व काकडीच्या पाने पोखरणा-या आळीच्या नियंत्रणासाठी कामरोमाझीन 0.003 % हे किटकनाशक प्रभावी दिसुन आले.
  2. टोमॅटोमध्ये फळे पोखरणा-या आळीच्या नियंत्रणासाठी झेंडुची लागवड 'Trap Crop' म्हणुन वापर करणे चांगले परीणामकारक दिसुन आले व फायद्याचे आढळले. सर्वात कमी फळे पोखरणा-या अळीचे प्रमाण Tomato + झेंडु (Merigold + Cypermethrin) या संस्कारामघील आढळले.
  3. टोमॅटोवरील फळपोखरणा-या आळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पीक 50 % फुलो-यावर आल्यानंतर प्रती हेक्टरी 250 रोगग्रस्त अळ्यांपासुन बनवलेली विषाणुंचे द्रावण (एच. एन. पी. व्ही. 250 एल. ई.) यांच्यातील फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
  4. फळ पोखरणा-या आळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा प्रीटीओसम या परोपजीवी किटकाचे 50 हजार प्रौढ प्रती हेक्टरी प्रसारण (2.5 लक्ष प्रौढ प्रती हेक्टर) या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने 5 प्रसारणे करावीत पहिल्या प्रसारणापासुन 5 दिवसानंतर सदर किडीचा विषाणू (HNPV) 250 LE प्रती हेक्टरी या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने पीक 50 % फुलो-यावर आल्यानंतर 3 फवारण्या देण्याची किंवा सदर किडीच्या विषाणूची 250 LE प्रती हेक्टरी 250 LE प्रती हेक्टरी या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने 5 फवारण्या देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  5. मध्यम मर्यादीत वाढीच्या टोमॅटोच्या संकरीत वाणासाठी 20 टन शेणखत व 300:150:150 किलो प्रती हेक्टर नत्र,स्फुरद, पालाश या रासायनीक खतांच्या मात्रा देण्याची शिफारस करण्यात येत आहे. यापैकी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच पूर्ण शेणखताची मात्रा लागवडीवेळी द्यावी. उरलेले नत्र लागवडीनंतर 3 हप्त्यात विभागुन द्यावे.
  6. टोमॅटोच्या ' धनश्री' वानासाठी शेणखत 20 टन प्रती हेक्टर आणी मुख्य अन्नद्रव्य 200:100:100 नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टर देण्याची शिफारास केली आहे. टोमॅटोच्या पूर्व लागवडीच्या अगोदर शेणखताची पूर्ण मात्रा तसेच नत्र खताची अर्धी मात्रा, स्फुरद व पालाश खताची पूर्ण मात्रा द्यावी आणि नत्राची राहीलेली मात्रा तीन समान भागामध्ये करून 20 दिवसांच्या अंतराने द्यावी.