*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 10 June 2013

भेंडी-

भेंडी-
  1. भेंडीच्या अर्का अनामिका वाणाच्या पश्चीम महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशातील उन्हाळी पिकास प्रती हेक्टरी 150 किलो नत्र दोन हप्त्यात, 50 किलो स्फुरद व 75 किलो पालाश खते द्यावीत.
  2. भेंडी बिजोत्पादनाच्या उत्पादनाकरीता 30 X 40 सेमीवर टोकण आणि 100+50+50 किलो नत्र,स्फुरद,पालाश प्रती हेक्टरी खतमात्रा योग्य.
  3. भेंडीच्या पिकासाठी 20 टन चांगले कुजलेले शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. फक्त नत्राची मात्रा 50 % पेरणीच्या वेळेस द्यावी व उरलेली 50 % मात्रा एक महीन्यानंतर देण्याची शिफारस आहे. त्याच बरोबर 30 X 20 सेमी अंतरावर पेरणी केल्यामुळे बियाणे जास्तीत जास्त मीळते.
  4. भेंडी नवीन वाण फुले उत्कर्ष (जी.के IV-3-3-3) या वाणाचे उत्पादन 23 टन प्रती हेक्टरी आहे. हे उत्पादन अर्का अनामीकापेक्षा 43.26 % जास्त आहे. अर्का अनामीकाचे उत्पादन प्रती हेक्टरी 16.12 टन आहे. हा वाण हळदी रोग (Yellow Vein mosaic virus) साठी प्रतीकारक आहे. फळांची क्वालीटी चांगली आहे व त्यांची परिपक्वताही लवकर आहे. (पहीली तोडणी 49 ते 52 दिवस)
  5. जी.के IV-3-3-3 या वाणाने 215.92 क्विंटल प्रती हेक्टर हे सर्वाधीक उत्पादन दिले. फळे आकर्षक, सरळ, लुसलुशीत हिरवीगार व चकचकीत आहेत केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमै दिसला. खरीप व उन्हाळी लागवडीस पूर्व प्रसारीत केला.