*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 10 June 2013

सोयाबिन-

सोयाबिन-
  1. ज्योती पेरणीयंत्र सोयाबिनच्या पेरणीकरीता वापरल्याने 20 टक्के उत्पादन वाढले.
  2. वेगवेगळ्या लवकर तयार होणा-या सोयाबिनच्या तीन जातीच्या प्रगत जातीच्या प्रयोगात के-93005, व के-93007 प्रत्येकी ( 2797 किलो प्रती हेक्टरी) व (2670 किलो प्रती हेक्टरी ह्या वाणाचे ऊत्पन्न मिळाले.
  3. सोयाबिन पिकावर पडणा-या महत्वाच्या किडींच्या नियंत्रणासाठी पीक फुलो-यात असताना 0.01 टक्के फेनव्हेलरेट किंवा 0.01 टक्के फ्लूव्हॅलीनेट या किटकनाशकांची फवारणी केली असता तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणारी अळी, केसाळ अळी या किडींचे नियंत्रण प्रभावीपणे होते.
  4. सोयाबिन पीकाचे अधिक उत्पन्न येण्यासाठी 50 किलो नत्र ( 50 टक्के नत्र पेरणीच्या वेळी व उरलेला नत्र पेरणीपासून 20-25 दिवसांनी) 75 किलो स्फुरद खताबरोबर देण्याची विविध हवामान विभागासाठी शिफारस करण्यात येत आहे.
  5. मैदानी विभागातील पर्जन्यगट क्र. 1 व 2 मधील क प्रकारच्या जमीनीत जे.एस-335 ची पेरणी मे च्या दुस-या पंधरवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यत करावी.
  6. उपपर्वतीय मावळ विभागातील गट क्र-7 मधिल मध्यम प्रकारच्या जमीनीत सोयाबिनच्या अधिक उत्पादनासाठी एम.ए.सी.एन-13 व एम.ए.सी.एस.-124 ची पेरणी 26 व 27 या हवामान आठवड्यात करावी.
  7. सोयबिन फुले कल्याणी (डी.एस.-228) जास्त उत्पादन देणारा वाण ( 23-24 क्वींटल प्रती हेक्टरी ) तांबेरा रोगासाठी प्रतीकारक उत्पादन पि.के-1029 वाणापेक्षा 25 टक्के जास्त व जे.एस-335 वाणापेक्षा 29 टक्के जास्त.
  8. सोयाबिनच्या टी.ए.एम.एस-38 हा नवीन वाण जास्त उत्पादन देणारा वाण आहे. लवकर येणारा व मुख्य रोग व किडींना प्रतीकारक आहे.
  9. सोयाबिनच्या बियाण्यातील प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी (40 टक्के पर्यत ) नत्र 30 किलो ग्रॅम + 75 किलो पालाश पेरणीच्या वेळेस टाकावे व 2 टक्के नत्राची फवारणी 40 दिवसानंतर करण्याची शिफारस आहे.
  10. सोयाबिन पिकासाठी प्रमाणीत केलेल्या खताची मात्रा कमी करुन (15 कि. नत्र आणि 16 किलो स्फुरद प्रती हेक्टरी ) वापरावी व बियाण्याला रायझोबियम कल्चर व आणि पि.एस.बि. (25 ग्रॅम प्रती किलो बियाणे) साठी अमोनियम मॉलिब्डेट ( 4 ग्रॅम प्रती किलो बियाणे) साठी वापरल्यास ऊत्पादन वाढते.
  11. सोयाबिनचे ऊत्पादन वाढविण्यासाठी 2 किवा 4 ओळीनंतर सोयाबिनच्या शेवटच्या कोळपणीच्या वेळेस सरी सोडावयाची शिफारस आहे.
  12. पेंडीमेथिलीन 1 किँलो क्रीयाशिल घटक प्रती हेक्टरी पेरणीनंतर लगेच फवारल्यास व 20 - 25 दिवसांनी एक खुरपणी केल्यास तणांचे नियंत्रण होते.
  13. सोयाबिन + मध्यम कालावधीचे तुरीचे वाण (3.1) आंतरपिक या ओळीचा प्रमाणात मध्यम खोल जमीनीसाठी शिफारस.
  14. सोयाबिन खोडमाशी नियंत्रणासाठी पेरणीनंतर 20 दिवसांनी रोगार 1 मिली. प्रती फवारणे.
  15. In Micronutrient trial application of Zinc 5 Kg per ha. Seed treatment with sodium molybdate 4 g per kg alone and along with fym recorded significant increase in yield Maximum being in Zinc 5 Kg per ha + FYM 10 t per ha
  16. डी.एस.-228 या वाणाचे उत्पन्न तुल्य वाण पिके-1029 पेक्षा 16.07 टक्के, जे.एस-335 पेक्षा 23.94टक्के व एम.ए.सी.5-450 पेक्षा 18.32 टक्के अधिक असल्याने तसेच हा वाण तांबेरा रोगात तुल्य वाणापेक्षा कमी बळी पडते.