*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 18 March 2013

भुईमुग रोगाचे/किडीचे नाव : लाल केसाळ अळी


भुईमुग

रोगाचे/किडीचे नाव : 
लाल केसाळ अळी

कारणीभूत घटक : 
1) शेताची अस्वच्छता. 
2) यजमान पिकाची उपलब्धता. 
3) वातावरणातील बदल घटते तापमान व वाढता गारवा. 

रोगांचे /किडीचे वर्णन : 
या किडीचे पतंग मध्यम आकाराचे पंखावर गुलाबी छटा असलेले असून त्यावर काळे ठिपके असतात. पतंग दिसण्यास सुंदर असतो. अळीच्या अंगावर असंख्य केस असतात अळीचा रंग पीवळसर गुलाबी असून दिन्ही बाजूस काळे पट्टे असतात 
नुकसानीच्या प्रकार – प्रथम आळ्या पुंजक्याने आढळतात, पानाच्या खालच्या बाजूने खातात, पानातील हिरवा भाग खाल्ल्यामुळे पाने जाळीसारखी दिसतात नंतर अळ्या विखूरल्या जाऊन झाडाचे कोवळे भाग खातात प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानावर मोठी भोके दिसतात, अळ्या एका शेतातून दुस-या शेतात जातात. 
यजमान पिके – सुर्यफूल, सोयाबीन, बहूवर्षीय पिके, ई. मागच्या बाजूस अंडी घालते एक मादी ३०० ते १४०० अंडी घालते. अंडी १-५ दिवसात ऊबतात, अळीअवस्था १८ ते २८ दिवस राहते. नंतर जमिनीत कोषावस्थेत जाते ती १०-१८ दिवस राहाते कीडीचा जीवनक्रम ३५ – ४८ दिवसात पुर्ण होतो. किडीच्या प्रादुर्भाव – ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जास्त होतो.

प्रतिबंधात्मक उपाय : 
1) खोल नांगरट करावी 
2) तूर, हरभरा, टोमॅटो इत्यादी सारखे पिकाचा बिवड पिके वापरू नयेत. 
3) कामगंध सापळे ३ – ५ प्रती हेक्टर प्रमाणे वापरावेत.
4)प्राथमिक आवस्थेत अंडीपुंज नष्ट करावेत 

नियंत्रणात्मक उपाय : 
1) किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच एन्डोसल्फान किंवा फोसेलॉन १५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
2) निंबोळी आर्क ५ टक्के ची फवारणी करावी. 
3) एस.एल.एन.पी.व्ही ५०० एल.ई. १० मिली प्रती १० लीटर पाण्यातून फवारणी घ्यावी