मिरचीवरील करपा, बोकड्या, मूळकुज ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
२० मिलिलिटर रोगर + बावीस्टीन प्रती १० लिटर पाणी,
२० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड + २० ग्रॅम झायनिब प्रती १० लिटर पाणी,
२० ग्रॅम एम्-४५ + १३ मिलिलिटर मोनोक्रोटोफॉस प्रती १० लिटर पाणी,
४ मिलिलिटर कॉन्फीडॉर प्रती १० लिटर पाणी
ह्याप्रमाणे फवारणी घ्यावी. नीमपावडरीपासून काढलेल्या ५ टक्के अर्काची फवारणी दोन फवारण्यांच्या मध्ये घ्यावी. फवारणी साधारणतः ७ ते ८ दिवसांच्या अंतराने घ्यावी. मूळकुजेसाठी १ टक्का बोर्डो मिश्रणाचे (१०० लिटर पाण्यात १ किलो चुना + १ किलो मोरचूद ) द्रावण प्रत्येक झाडास १/२ ते १ लिटर ह्या प्रमाणात ८ दिवसांच्या अंतराने ओतावे व नंतर प्रत्येक झाडास १० ते २० ग्रॅम ट्रायकोडर्मा शेणखतासोबत द्यावे. जमीन नेहमी वापशावर राहील एवढे पाणी द्यावे. खतांच्या बाबतीत नत्र, स्फुरद, पलाश हे १००:५०:५० ह्या प्रमाणात, हेक्टरी १०० किलो असे द्यावे. ठिबकसिंचनाची व्यवस्था असल्यास खते पाण्यातून द्यावीत.