*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Tuesday, 24 July 2012

कपाशी आणि इतर पिकावर येणारी पांढरी माशी




रोगाचे/किडीचे नाव : 
पांढरी माशी 

कारणीभूत घटक : 
- अनेक पिकांवर आढळते. 
-शेजारील पिकावरुन बागेत येण्याची शक्यता.
-अतिविषारी किटकनाशके सुरुवातीस वापरल्यास प्रतीकारशक्ती तयार होऊन नियंत्रण अवघड जाते. 
प्रतिबंधात्मक उपाय : 
-किडग्रस्त पाने जाळावीत बागेत स्वच्छता राखावी.
-सिंथेटीक पायरेथ्रॉईडस शेवटी वापरावीत.
-शेजारील पिकावरील नियंत्रण करावे. 

नियंत्रणात्मक उपाय : 
जैविक उपाय :
- पिवळ्या स्टीकी ट्रॅपचा वापर करावा.
- 1 टक्का निंबोळी तेल किंवा 5 टक्के निंबोळी पावडरचा अर्क फवारावा.
- क्रायसोपर्ला 1000 अळ्या प्रती एकरी सोडावेत. 

रासायनिक उपाय : 
-नुवान 7 मिली किंवा मेटासिस्टॉक 12 मिली मोनोक्रोटोफॉस 15 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 10 मिली किंवा ट्रायझोफॉस 12 मिली किंवा अँसीफेट 8 मिली यापैकी किटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
-फवारणी द्रावणात 6 मिली प्रती 10 लिटर पाणी सॅन्डोवीट मिसळून फवारावे.
-व्हर्टीसेल 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे त्यात सॅन्डोवीट वापरु नये. 

सामान्य माहिती : 
कपाशी,पेरू ,वटाणा,कोबी,टोमॅटो ,भेंडी ,वांगी 


अधिक माहीतीसाठी संपर्क :  अवलिया कृषी सेवा केंद्र वाशीम.  9822933702