![]() टोमॅटो रोगाचे/किडीचे नाव : करपा ( लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाईट)) रोगाचे कारण : अल्टरनेरीया सोलॅनी या रोगकारक बुरशीमुळे कारणीभूत घटक : 1)फळधारणेचा सुरुवातीचा काळात हा रोग जास्त दिसून येतो. 2)पाऊस पडल्यावर निर्माण होणारी आर्द्रता व नंतर येणा-या ऊष्ण आणि कोरड्या काळात मोठ्या प्रमाणावर पसरतो. 3)कमकुवत झाडे लवकर बळी पडतात. 4)कोरड्या हवामानात रोगाच्या प्रादुर्भाव जास्त होत नाही ![]() प्रतिबंधात्मक उपाय : टोमॅटोचे शेत स्वच्छ ठेवावे. चांगले बियाणे वापरावे, बियाण्यास प्रक्रीया करावी. शेतात पाणी साठू देऊ नये नियंत्रणात्मक उपाय : 1)लागवडीनंतर एका महिन्यात पहिल्या फवारणीने सुरुवात करावी. 2)पिक वाढीच्या कालावधीत 10 ते 15 दिवसांचा अंतराने सतत फवारणी द्यावी. 3)10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा ब्लायटॉक्स अथवा 25 ग्रॅम बाविस्टीन ईत्यादी बुरशी नाशके आलटून पालटून फवारल्यास प्रभावी रोग नियंत्रण होते. अवलिया कृषी सेवा केंद्र वाशीम. मोब. 9822933702 |