*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Friday 16 November 2012

गहू :

1) गहू पिकासाठी चांगल्या निचऱ्याची भारी आणि खोल जमिनीची निवड करावी. जिरायती गव्हाची ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीत लागवड करावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. दोन ओळींतील अंतर 22.5 सें.मी. ठेवून पेरणी करावी. बियाणे पाच ते सहा सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये. 2) उभी -आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. दोन चाडी पाभरीच्या वापराने पेरणीसोबतच रासायनिक खताचा पहिला हप्ताही देता येतो. हलक्‍या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते वापरावीत. 3) उतारानुसार जमिनीवर 2.5 ते 3.0 मीटर रुंदीचे सारे व आडव्या दिशेने पाट पाडावेत. नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यास हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी हेक्‍टरी 125 ते 150 किलो बियाणे वापरावे. पेरणी 18 सें.मी. अंतरावर करावी. जिरायती गव्हासाठी हेक्‍टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरून 22.5 सें.मी. अंतरावर पेरणी करावी.