*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Wednesday 31 October 2012

तुरी/हरभरा :- रोगाचे/किडीचे नाव : घाटे अळी/शेंगा पोखरणारी अळी


तुरी

रोगाचे/किडीचे नाव : 
घाटे अळी-बोंड अळी

रोगांचे /किडीचे वर्णन : 
विविध पिकांवर ही किड हिरवी बोंडअळी, घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी व फळ पोखरणारी अळी या नावाने ओळखली जाते. किडीची जीवनसाखळी अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमधून पुर्ण होते. पतंग फिक्कट पिवळा अथवा बदामी रंगाच्या असतो. त्याच्या पुढच्या पंखावर एक काळा ठीपका असतो. मादी व नराचे मिलन झाल्यावर मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर किंवा पानावर एक एक करुन अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पारदर्शक पिवळसर रंगाच्या असतात. नंतर अळीचे पाचवेळा रुपांतरण होऊन अळीची पुर्ण वाढ होते. पुर्ण वाढ झालेली अळी हिरवट रंगाची व 3.5 ते 5 सें.मी. खालीपर्यत घातले जातात. या अवस्थेमध्ये किडीच्या सर्व क्रीया मंदावलेल्या असतात. कोषातून नंतर पतंग बाहेर पडतात व किडीची दुसरी जीवनसाखळी सरु होते. व वर्षभरामध्ये 7-8 पिढ्या पुर्ण होतात.
किडीचा नुकसानीच्या प्रकार - हेलिकोव्हरपा किंवा हिरवी अळी या किडीच्या प्रादुर्भाव पिकानुसार शेंगा, फुले, फळे यावर आढळून येतो. लहान अळ्या सुरुवातीस कोवळे शेंडे, पाने व फुलावर ऊपजिवीका करतात. नंतर अळी बोंडे, फळे, यामध्ये शिरून आतील भाग खाते. खाताना अळी स्वताच्या अर्धा भाग आत मध्ये व अर्धा भाग बाहेर ठेवते. अळीने केलेली छिद्रे गोलाकार असून इतर अळ्यांच्या तुलनेत मोठी असतात. काही पिकांमध्ये किडींच्या प्रादुर्भावामुळे फुलगळ पातगळ आढळून येते.



प्रतिबंधात्मक उपाय : 
याशिवाय या किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याच्याही वापर करता येतो. तसेच तूर पिकांमध्ये झेंडुची ओळी लावावेत किड झेंडुवर आकर्षीत होते आणि झेंडू पिकांवर एन्डोसल्फान किंवा सायपरमेथ्रीन या किटकनाशकाची फवारणी करावी

नियंत्रणात्मक उपाय : 
जैविक उपाय :
तसेच मुख्य पिकावर एचएनपीव्ही 10 मिली 10 लिटर पाण्यातून 3 ते 4 वेळा फवारावे. ट्रायकोग्रामा व कॅम्पोसेरीत क्लोरीडी हे परोपजीवी किटक वापरुन डेल्फीन किंवा डायपेल या बीटीयुक्त जिवाणुंचे अथवा हेलिओकीस हे जैविक औषध वापरून या किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.

रासायनिक उपाय :
एन्डोसल्फान 35 ईसी 200 ते 2500 मिली – 500-1000 लिटर पाणी
मिथोनिल 40 एसपी 750 ते 1125 मिली – 500-1000 लिटर पाणी
थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 1000-500 लीटर पाणी
अल्फामेथ्रीन 10 ईसी 165 ते 280 मिली 600 ते 1000 लिटर पाणी
सायपरमेथ्रीन 25 ईसी 160 ते 260 मिली 400 ते 800 लिटर
फेनव्हेलरेट 20 ईसी 375 ते 500 मिली 700 ते 900 लिटर
क्लोरोपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 1000 मिली 500-1000 लिटर पाणी
डेल्टामीथ्रीन 1टक्का+ट्रायअँझोफॉस35टक्का 1000 ते 1200 मिली 600-1000 लिटर पाणी