*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Sunday, 16 September 2012

फळसड


टोमॅटो 

रोगाचे/किडीचे नाव : 
फळसड

प्रादुर्भाव व लक्षणे : 
या रोगामध्ये पानावर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे ठीपके दिसू लागतात. पानांच्या पाठीमागील बाजूस तपकिरी ठिपके दिसतात नंतर पाने वाळतात. तसेच फळांवर सुरुवातीस तांबूस तपकिरी ठिपके दिसतात व नंतर ते काळे पडतात. फळ वाढीच्या सुरुवातीच्या काळात हा रोग पडतो.

रोगांचे /किडीचे वर्णन : 
सुरूवातीस फळावर लहान तपकीरी गोलाकार ठीपके बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरी बुरशीची वाढ दिसून येते. हळूहळू ठीपके वाढत जातात व फळे सडतात. फळावर प्रादुर्भाव झालेल्या भागातील पेशीचा रंग उडतो, तपकीरी दिसावयास लागतात आणि फळ दाबल्यास प्रादुर्भाव झालेल्या भागातून पाणी निघते

प्रतिबंधात्मक उपाय : 
- डायथेन एम-45 हे औषध 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तिन फवारण्या कराव्यात.
- मॅन्कोझेब 75 डब्ल्यु पी 1500-2000 ग्रॅम 750 लिटर पाणी
- कॅप्टन 50 डब्ल्यु पी 2500 ग्रॅम 750-1000 लिटर पाणी
- सायमोक्झॅनिस + मॅन्कोझेब 72 डब्ल्यु पी 1520 ग्रॅम + 500 लिटर पाणी