![]() कोबी रोगाचे/किडीचे नाव : चौकोनी ठीपक्याच्या पतंग रोगांचे /किडीचे वर्णन : किडीचे पतंग आकाराने अतिशय लहान असून त्याची लांबी 8-10 सेंमी असते. रंग धुरकट तपकिरी व पुढील पंखाच्या खालच्या टोकाला पांढरा चौकोनी ठिपका असतो. म्हणून किडीस चौकोनी ठिपक्यांच्या पतंग असे म्हणतात. मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस अलग अलग अंडी घालतात. अंडी फीकट पांढरट रंगाची असतात. आठवड्याच्या आत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. अळ्या पिवळसर रंगाच्या असून पुर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी 8 ते 12 मि.मि असते कोषावस्था जमिनीत पुर्ण केली जाते. नंतर कोषातून पतंग बाहेर पडतात. एक ते सव्वा महिन्यात एक पिढी पुर्ण होते. सुरुवातीला अळ्या पानाच्या खालच्या भाग कुरतडून खातात. त्यामुळे छीद्रे पडलेली दिसतात. मोठ्या प्रमाणात किडीच्या उपद्रव झाल्यास पानावर फक्त शिराच शिल्लक राहतात व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महाराष्ट्रात सप्टेंबर पासून मार्चपर्यत किडीच्या उपद्रव आढळून येतो. ![]() प्रतिबंधात्मक उपाय : कार्बारील 50 डब्ल्यु.डी.पी. 1500-3000 ग्रॅम 1000 लिटर पाणी फेनव्हेलरेट 20 ईसी 300-375 ग्रॅम 600-750 लिटर पाणी स्पिनोसॅड 2.5 ईसी 600-700 मिली 500 लिटर पाणी डायफेन्थीयुरॉन 50 डब्ल्युपी 600 मिली 500 ते 750 लिटर पाणी क्वीनॉलफॉस 25 ईसी 1000 मिली 500-1000 लिटर पाणी |