*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Sunday 5 October 2014

शेवगा लागवड कधी करावी?

शेवगा लागवड कधी करावी?


शेवगा लागवडीसाठी डोंगर उताराच्या, हलक्‍या माळरानाची भरड जमीन चांगली असते. लागवडीसाठी कोकण रुचिरा, पी.के.एम.-1, पी.के.एम.-2 या जातींची निवड करावी. कोकण रुचिरा या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या, मध्यम लांब आणि शिजण्यास चांगल्या असतात. पी.के.एम.-1, पी.के.एम.-2 या जाती सहा ते आठ महिन्यांत फुलोऱ्यावर येतात. दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर चार ते पाच मीटर ठेवावे. लागवड करताना 60 सें.मी x 60 सें.मी x 60 सें.मी आकाराचे खड्डे खणून शेणखत आणि मातीचे मिश्रण भरावे. लागवड जून-जुलैमध्ये करावी. 
संपर्क - 02452-229000 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी