*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Thursday 16 October 2014

हरभरा लागवडीचे नियोजन

हरभरा लागवडीचे नियोजन


हरभरा लागवडीचे नियोजन


1. हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बागायत हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. पेरणी वाफशावर करावी. 
2. जातीनुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे. विकास आणि फुले जी- 12 या वाणासाठी हेक्‍टरी 70 किलो, विश्‍वास आणि विजयासाठी 85 किलो तसेच दिग्विजय, विशाल व विराट या वाणासाठी हेक्‍टरी 100 किलो बियाणे वापरावे. 
3) पेरणीसाठी प्रमाणित अगर खात्रीचे बियाणे वापरावे. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केलेली नसल्यास प्रतिकिलो बियाण्यास 2 ते 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 2 ते 2.5 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड पाण्यातून बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरावे. 
4) पेरणी 30 x 10 सें.मी. अंतरावर करून झाडांची संख्या हेक्‍टरी 3,33,333 ठेवावी. 
5) घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात पक्षी थांबे करण्यासाठी हेक्‍टरी वापरावयाच्या हरभरा बियाण्यात 200 ग्रॅम ज्वारी मिसळून पेरणी करावी. 
6) बागायती पिकाला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 32 किलो पालाश (56 किलो युरिया, 312 किलो सुपर फॉस्फेट व 50 किलो मुरेट ऑफ पोटॅश) किंवा 125 किलो डाय अमोनिअम फॉस्फेट प्रतिहेक्‍टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावी. दोन चाडी पाभरीने पेरणी करावी. 
7) हरभरा पिकास साधारणपणे 12 सें.मी. पाण्याची गरज असते. पेरणी वापशावर करावी. जमिनीतील ओल पाहून पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी फांद्या फुटताना द्यावे आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी घाटे भरताना द्यावे. प्रत्येक वेळी पाणी योग्य प्रमाणात द्यावे. जास्त पाणी दिले गेल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. 8) हरभरा-करडई आंतरपीक (6-3) पद्धतीचा वापर करा. 
9) आंतरमशागत- पेरणीनंतर 21 दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी खुरपणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी. 
11. पेरणीसाठी खालील वाणांची निवड करावी.


माहिती संदर्भ :

अॅग्रोवन