*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Saturday, 25 August 2012

पानवरील टिक्का


भुईमुग

रोगाचे/किडीचे नाव : 
पानवरील टिक्का

रोगाचे कारण : 
फीजीऑरीऑप्सीस परसोनेटा आणि सर्कोस्पोरा अँरिचीडीकोला या दोन बुरशीपैकी पहिली बुरशी प्रारंभिक अवस्थेत टिक्का रोग आणते आणि नंतर मोठ्या प्रमाणात रोग पसरतो.

कारणीभूत घटक : 
1)रोगग्रस्त शेतातील झाडांचे अवशेष
2)अन्नद्रव्याची कमतरता
3)सतत एकसारखी पिकांची लागण
4)रस शोषणा-या किडींचा प्रादुर्भाव

प्रतिबंधात्मक उपाय : 
1)रोगग्रस्त शेतातील झाडांचे अवशेष जाळून किंवा पुरुन नष्ट करावेत.
2)अन्नद्रव्याची कमतरता असल्यास त्याची फवारणी करावी किंवा जमिनीत टाकावी.
3)पिकांची फेरपालट करावी.
4)बिजप्रक्रीया करुन बियाण्यांची लागवड करावी.
5)पेरणीच्या तारखांत बदल करुनही रोग नियंत्रण करता येते.
6)लवकर तयार होणा-या जातींची लागवड केल्यास रोग येण्याचा काळात त्या सापडत नाहीत.

नियंत्रणात्मक उपाय : 
1)या रोगाचा नियंत्रणासाठी काही किटकांच्या बंदोबस्त करावा. त्यासाठी त्यासाठी आंतरप्रवाही किटकनाशक वापरावे.
2)आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केल्यास रोगांचे प्रभावी नियंत्रण करता येते. 10 लिटर पाण्यात डायथेन एम-45 20 ग्रॅम, 25 ग्रॅभ ब्लायटॉक्स, 10 ग्रॅम, कार्बेडेझीम यांची आलटूम पालटून फवारणी केल्यास रोग नियंत्रण करण्यास मदत होते.