टोमॅटो रोगाचे/किडीचे नाव : करपा ( उशीरा येणारा करपा ) प्रादुर्भाव व लक्षणे : या रोगामध्ये पानावर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे ठीपके दिसू लागतात. पानांच्या पाठीमागील बाजूस तपकिरी ठिपके दिसतात नंतर पाने वाळतात. तसेच फळांवर सुरुवातीस तांबूस तपकिरी ठिपके दिसतात व नंतर ते काळे पडतात. फळ वाढीच्या सुरुवातीच्या काळात हा रोग पडतो. नियंत्रणात्मक उपाय : 1) डायथेन एम-45 हे औषध 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तिन फवारण्या कराव्यात. 2 ) मॅन्कोझेब 75 डब्ल्यु पी 1500-2000 ग्रॅम 750 लिटर पाणी कॅप्टन 50 डब्ल्यु पी 2500 ग्रॅम 750-1000 लिटर पाणी सायमोक्झॅनिस + मॅन्कोझेब 72 डब्ल्यु पी 1520 ग्रॅम + 500 लिटर पाणी. अवलिया कृषी सेवा केंद्र वाशीम. मोब. 9822933702 |